fbpx

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास रासपचा विरोध

पुणे:राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक ससून हॉस्पिटलसमोर पुणे येथे करण्यात आले . याप्रसंगी पुणे जिल्ह्यातील विभागानुसार राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदनियुक्या प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते यांच्या हस्ते देण्यात आल्या
यावेळी सचिन गुरव यांना पश्चिम महाराष्ट्र समनव्यक म्हणून निवड करण्यात आली यावेळी पुणे जिल्ह्यातील पदाधिकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ,महानगरपालिका, नगरपरिषदा निवडणुकी संदर्भात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना काशीनाथ नाना शेवते म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभर प्रसार करीत आहेत .
सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते ,मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य ज्ञानेश्वर सलगर, कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने ,युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अजित पाटील ,पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे,पुणे व पिंपरी चिंचवड अध्यक्ष विनायक रुपनवर ,पुणे जिल्हा महिला अध्यक्षा कविता जावळे,पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार, पुणे शहर महिला अध्यक्षा सुनीता किरवे व मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: