fbpx

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा विक्रम नलावडे मानकरी

पंढरपूर : ५५ ते ६५ वयोगटातील बीड येथील विक्रम नलावडे  (वारकरी महावीर), ७० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील औसा येथील उत्तम किरवले (ज्येष्ठ वारकरी महावीर) तर १६ ते २५ वयोगटातील नांदेड भास्कर कदम (कुमार वारकरी कुस्ती महावीर) किताबाचे मानकरी ठरले.
मानाचा फेटा, माऊली व जगद्गुरूंची प्रतिमा शाल, स्मृतिचिन्ह, पदक व रोख रक्कम व तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना, औसा, लातून व कर्नाटक येथील जवळपास २०० पेक्षा अधिक वारकरी मल्लांनी भाग घेतला.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होता.
या वेळी हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, हिंदकेसरी जगदीश कालीरमण, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम आणि पै.विष्णूतात्या जोशीलकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होत.
तसेच, विश्व शांती केंद्र (आळंदी),माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहूल विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठापचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, माईर्स एमआयटी शिक्षण समूहाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम दा. कराड, पंडित वसंतराव गाडगीळ, बिहारचे केशव झा,वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव विलास कथुरे आणि डॉ.पी.जी.धनवे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी कुस्ती स्पर्धेचे सूत्रसंचालन किसन बुचडे यांनी केल. श्री. शंकरअण्णा पुजारी यांनी या स्पर्धेचे धावते वर्णन केले. तर विलास कथुरे यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले.

विविध वयोगटातील विजेते पुढीलप्रमाणेः
प्रथम सुवर्ण              द्वितीय रौप्य पदक             तृतीय कांस्य पदक
वयोगट
१६ ते २५   भास्कर कदम(नांदेड)    भुजंग सरवदे (परभणी)        हनुमान जोगदंडे(नांदेड)
२६ ते ३५   लक्ष्मण करे (बीड)      गोविंद उबाळे (लातूर)         सचिन नरळे(सोलापूर)
३६ ते ४५   दादासाहेब क्षिरसागर(उ.बाद) कैलास बोचरे (नांदेड)    संतोष शिंदे (नांदेड)
४५ ते ५५   अंकुश भडक(जालना)   अर्जुन रहाडे (बीड)          सुरेश डोंगे (औरंगाबाद)
५६ ते ६५  विक्रम नलवडे (बीड)     शिवानंद सगाई  (विजापूर)    कमलाकर मुळे(लातूर)

७० वर्षा
पुढील       उत्तम किरवले(औसा)     वसंत जावळे (उ.बाद)       आत्माराम रूपनवर(सोलापूर)

Leave a Reply

%d bloggers like this: