fbpx

नगरपालिका, नगर पंचायत निवडणूक ओबीसी आरक्षणा विना घेण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध

पुणे:सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व समाज घटकाची जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर कुणाला किती प्रतिनिधित्व आजपर्यंत मिळालेल आहे व किती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी तंतोतंत अनुभवजन्य वस्तुनिष्ठ संख्यात्मक माहिती(Rigorous empirical data) गोळा करून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.तद्नंतरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेतल्या पाहीजेत ही संभाजी ब्रिगेडची भुमीका आहे.
वर्तमान परिस्थितीत आडनावांच्या आधारे जो इंपेरिकल डाटा तयार केलाय तो अत्यंत चुकिचा आहे कारण एकाच आडनावांचे लोक वेगवेगळ्या समाजात आहेत व त्या अनुषंगाने हा डाटा बोगस व बनवाबनवीचा आहे.
ही निवडणूक जाहीर करून ओबीसी समाजाच्या अधिकारावर गदा आणण्याच काम करत त्यांच्या हक्क-अधिकारापासून वंचित ठेवण्याची प्रचंड मोठी खेळी भारताच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात होतांना दिसते.म्हणून संभाजी ब्रिगेडचा ओबिसी विना निवडणूक घेण्यास तिव्र विरोध आहे.ही मागणी संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी केली आहे.
अशी माहिती संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष,चंद्रशेखर घाडगे यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: