fbpx

धनुष्यबाण शिवसेनेचाच; मध्यवधी निवडणुका व्हायला पाहिजेत – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई मध्ये  पक्ष सोडून गेलेले शिवसेनेचे नगरसेवक नाहीत, ते शिंदे यांचे समर्थक असतील. सामान्य कार्यकर्ते शिवसेने सोबत आहेत. शिवसेनेला कुणीही धक्का पोहचू शकत नाही. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जाता आहे, रस्त्यावरचा पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असतो. यामुळे  कायद्याच्या दृष्टीने बघितले तर शिवसेनेचा धनुष्यबाण कुणीही हिसकावून घेऊ शकणार नाही. धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे आणि राहील असा विश्वास कार्यकर्त्यांना देत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यवधी निवडणुका व्हायला पाहिजेत असे सांगितले.

मुख्यमंत्री पद सोडल्याननंतर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, लोक मतदान करताना पक्ष चिन्ह बघतात, मतदार धनुष्यबाण बघून मतदान करतात, मात्र व्यक्तीही बघतात. असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. मोठी झालेली माणसे गेली असले तरी ज्यांनी मोठे केले ते आजही शिवसेनेत आहेत.

आपल्या देशात सत्यमेव जायते आहेत, असत्यमेव नव्हे,11 जुलै रोजीची सुनावणी देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारी आहे. आपली लोकशाही किती मजबूत राहणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण होत आहे की नाही हे पहाणारी आहे.

शिंदे गटात गेले तरी त्यांचे आमच्यावर असलेले प्रेम व्यक्त करत आहेत त्याबद्दल धन्यवाद. परंतु ही लोक मागील अडीच वर्षे माझ्यावर आणि ठाकरे परिवारावर विकृत टीका केली, माया मुलांच्या जिवावर उठले  त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आणि त्यांचे हार तुरे स्वीकारत आहात यामुळे तुमच्या मनात नक्की काय आहे तुमचे प्रेम खरे की  खोटे हे जनतेला द्या.

आषाढी एकादशी जवळ आली आहे, वारकऱ्यांनी मला पंढरपूरला येण्याचे निमंत्रण दिले आहे,  राजकीय गदारोळ संपल्यानंतर पंढरपूरला जाणार.

Leave a Reply

%d bloggers like this: