fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

७ वर्ष वयाच्या आर्य धोत्रेचा १० कि मी धावण्यात जागतिक विक्रम

पुणे : सेंट व्हिन्सेंट प्रायमरी स्कुलमध्ये शिकणाऱ्या ७ वर्ष वयाच्या आर्य अनुप धोत्रेने ५९ मिनिटात १० किलोमीटर धावण्याचा जागतिक विक्रम केला आहे. हा विक्रम ‘ वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ एक्सलन्स ‘ मध्ये नोंदवला गेला आहे. सणस ग्राऊंड येथे त्याने हा विक्रम पूर्ण केला. एकलव्य अॅथलेटिक क्लब ( सणस ग्राऊंड ) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करुन हे यश मिळवले. धोत्रे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवाराने या विक्रमाबद्दल आर्यचे अभिनंदन केले

Leave a Reply

%d bloggers like this: