fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विषयक कायद्यावर आधारीत चर्चासत्राचे आयोजन

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, लायन्स क्लब ऑफ पुणे विधीज्ञ, सागर मित्र, बार असोसिएशन ऑफ एनजीटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विषयक कायदे आणि मानवाधिकाराचे उल्लंघन या विषयावर चर्चासत्राचे दूरदृष्य प्रणालीद्वारे गुरुवारी (७ जुलै) आयोजन करण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप यांनी प्राधिकरणाचे कार्य आणि पर्यावरण विषयक कायद्याच्या जनजागृतीची गरज याबाबत विचार मांडले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजानन कुलकर्णी यांनी ध्वनी प्रदूषण, राष्ट्रीय हरित लवादाचे (एनजीटी) ॲड.दत्तात्रय देवळे यांनी प्लास्टिक आणि ई-कचऱ्यासंबंधी कायदे, सागरमित्रचे विनोद बोधनकर यांनी प्लास्टिक व ई-कचऱ्यामुळे होणारे भूमी आणि जलप्रदूषण याविषयी माहिती दिली.

ॲड.प्रिती परांजपे यांनी कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक केले. महानगरपालिका शिक्षण विभागाचे राजेंद्र दुमाणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चर्चासत्राला महानगरपालिकेच्या शाळांमधील २६५ विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading