fbpx

छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

पुणे : छावा क्रांतिवीर विध्यार्थी सेना पुणे जिल्हा आयोजित इयत्ता १० वी १२ वी च्या मार्च २०२१ ते २०२२ या वर्षात उत्तीर्ण झालेल्या कोळवन खोऱ्यातील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शन शिबिर व गौरवचिन्ह सोहळा न्यू इंग्लिश स्कूल कोळवन येथे दिनांक संपन्न झाला
या कार्यक्रमाला मुळशी तालुका कृषी अधिकारी भालेराव,करियर मार्गदर्शन शिबीर साठी विनोद साळवे, एमआयटी कॉलेज मुख्यध्यापक तळेगाव, कोळवन स्कूल चे मुख्यध्यापक  बनसोडे ए ई व भारतीय जवान  तानाजी चौगुले, कोळवन ग्रुप ग्रामपंचायत सरपंच धनश्री पालकर, ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब उपस्थिती लाभली सूत्रसंचालन विद्या कुंभार  ने केले सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केदारी  यांनी केले न्यू इंग्लिश स्कूल कोळवन, मामासाहेब मोहोळ विद्यालय कुळे, माध्यमिक विद्यालय काशिग विशेष सहकार्य लाभले
यावेळी छावा क्रांतिवीर विध्यार्थी सेना पुणे जिल्हाध्यक्ष राजू फाले, जिल्हाउपाध्यक्ष प्रतीक साखरे,तालुका कार्याध्यक्ष रणजीत हुलावळे, अनिकेत हुलावळे, राजेंद्र शेळके, तुषार हुलावळे आदी पदाधिकारी व तीनही शाळेत चे विध्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: