fbpx

मुस्लीम धर्मगुरुची येवल्यात गोळ्या घालून हत्या

नाशिक : मूळचे अफगाणिस्तानच्या असलेल्या मुस्लीम धर्मगुरुंची येवल्यात गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ख्वाजा सय्यद चिस्ती उर्फ सुफी बाबा (वय ३५) असे या धर्मगुरूंचे नाव आहे. येवल्यातील एमआयडीसी परिसरात ही घटना घडली असून जमीन खरेदीच्या वादातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांनी दीलेल्या माहितीनुसार, येवला एमआयडीसी परिसरात चार अज्ञात व्यक्तींनी सुफी बाबा यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या, व नंतर हे मारेकरी फरार झालेत. हल्लेखोरांनी डोक्यात गोळ्या घातल्याने सुफी बाबा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती येवला पोलिसांना कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमीन खरेदीच्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे. 

दरम्यान, मौलवी हे मूळचे अफगाणचे असून येवल्यात ते सुफी बाबा म्हणून परिचित हाेते. गेल्या अनेक वर्षांपासून ते येवला शहरात राहात होते. या घटनेनंतर पोलिसांनी सय्यद चिश्ती यांच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: