fbpx

Rain update : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ‘रेड अलर्ट’

पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पुढील पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातही मुसळधार पावसामुळे हजेरी लावली असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. तर कोकण, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच आता पुढील चार ते पाच दिवस काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणात मध्यम ते मधूनमधून तीव्र सरी कोसळत आहेत; पालघर, मुंबई ठाणे रायगड पुढील ३, ४ तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातही अशीच परिस्थिती आहे. पुढील चार ते पाच दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: