Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आम्ही बंड नाही उठाव केलाय – बंडखोर आमदार गुलाबराव पाटील 

मुंबई : आम्ही बंड केल्यापासून राज्यातील अनेक नेत्यांनी आमच्यावर खालच्या भाषेत टीका केली. पण आम्ही हे बंड केल नाही. आम्ही उठाव केला आहे. बाळासाहेबांचे विचार वाढवण्यासाठी आम्ही हे मोठे पाऊल उचलले आहे. शिवसैनिकांना मान्य असणारा निर्णय आम्ही घेतला आहे, असे मत बंडखोर आमदार गुलाबराव पाटील.

फडणवीस – शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आमदार गुराबराव पाटील हे विधीमंडळात बोलत होते. यावेळी शेरो शायरी करत आपले मत व्यक्त केले व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेब आणि त्यांच्या मुलाला आम्हाला दुःख द्यायचे नव्हते. पण आमचा नाईलाज आहे. आम्ही 35, 30 वर्ष आमदारकी आसणारे आमदार पक्षातून बाहेर पडतो म्हणजे पक्षाने विचार केला पाहिजे. जेव्हा 4 आमदार जातात तेव्हा ते बंड असते पण 40 आमदार जातात तेव्हा तो उठाव असतो. पक्ष प्रमुखांना काही लोकांनी घेरून ठेवले आहे. आम्ही त्यांच्यापासून लांब गेलेलो नाही तर आम्हाला लांब लोटण्यात आले आहे. जेव्हा कधी आम्हाला पक्ष प्रमुखांना भेटायचे असायचे तेव्हा आम्हाला वेळ मिळत नसे. तेव्हा आमच्या समस्या या एकनाथ शिंदे यांनी ऐकल्या आम्हाला मदत केली.

पुढे बोलताना गुलाबराव पाटील, आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत आणि शेवट पर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून राहणार आहोत. आम्ही शिवसैनिकां सोबत लढणार नसून आम्ही त्यांना जोडण्याचे काम करणार आहोत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading