Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

अलाइड ब्लेंडर्स आणि डिस्टिलर्स तर्फे रू.2000  कोटींच्या आपपीओसाठी डीएएचआरपी दाखल

पुणे : वित्त वर्षे 2014 आणि 2021 दरम्यान भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या प्रकारात (आयएमएफल) एकूण विक्रीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी आणि भारतातील तिसर्‍या क्रमांकाची कंपनी असलेल्या  मुंबई स्थित अलाईड ब्लेंडर्स आणि डिस्टिलर्सने भारतीय भांडवली बाजार नियामक असलेल्या सिक्युरिटिज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडे प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (IPO) मसुदा प्रस्ताव (DHRP) दाखल केला आहे.
सदर प्रस्तावात प्रति समभाग फेस व्हॅल्यू रू.2 निश्चित करण्यात आली असून रू.1000 कोटींचे समभाग उपलब्ध करण्यात येणार आहेत आणि ऑफर-फॉर-सेल अंतर्गत प्रवर्तक आणि समभाग धारक बिना किशोर छाब्रिया रू.500 कोटी, तर रेशम छाब्रिया जितेंद्र हेमदेव हे रू.250 कोटी पर्यंत आणि नीशा किशोर छाब्रिया रू.250 कोटीं पर्यंतच्या त्यांच्याकडील समभागांची विक्री करणार आहेत. या प्रस्तावात कंपनीच्या पात्र कर्मचार्‍यांसाठी समभागांमध्ये आरक्षणही समाविष्ट करण्यात आले आहे.
हा प्रस्ताव बूक बिल्डिंग प्रोसेस द्वारे करण्यात आला असून त्यात 50% पर्यंत समभाग हे पात्र संस्थात्मक खरेदीदारांसांठी उपलब्ध असतील, तर 15% पर्यंत समभाग बिगर संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध नसतील आणि प्रस्तावातील 35% पर्यंत समभाग हे घाऊक वैयक्तिक बोलीदारांसाठी उपलब्ध असतील.
लीड बॅंकर्स बरोबरच्या चर्चेला अनूसरून रू.200 कोटी पर्यंतच्या शेअर्ससाठी कंपनी प्राधान्याने समभाग विक्रीच्या पर्यायाचा वापर करू शकते. अशा प्रकारे विक्री करण्यात आल्यास, एकूण प्रारंभिक समभाग विक्रीचा आकार कमी करण्यात येऊ शकतो.
या समभाग विक्रितून जमा झालेल्या निधीतिल रू.708.98 कोटी एवढ्या निधिचा विनिमय थकित कर्जाच्या काही भागाच्या अगाऊ परतपेढीसाठी अथवा निर्धातरित परतफेडीसाठी आणि बाकी रकमेचा विनिमय साधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी करण्यात येईल.
कंपनी संपूर्ण भारतात विक्री आणि वितरण जाळे असलेल्या भारतातील चार मद्य विक्री कंपन्यांपैकी ही एक मुंबई स्थित कंपनी आहे आणि वर्ष 2019 ते 2021 दरम्यान एकूण वार्षिक विक्रीबाबत आयएमएफएल प्रकारात आघाडीला आहे ज्यात वित्त वर्ष 2021 दरम्यान 20% एवढा सर्वात जास्त हिस्सा होता. ऑफिसर्स चॉइस व्हिस्की या आपल्या मुख्य नाममुद्रेच्या अनावरणासोबत कंपनीने आपला प्रवास 1988 मध्ये सुरू केला आणि त्यांनी प्रिमियम व्हिस्की प्रकरातही या निमित्ताने पदार्पण केले होते.
वर्ष 2016 ते 2019 दरम्यान ऑफिसर्स चॉइस व्हिस्की हा ब्रॅंड एकूण वार्षिक विक्रीच्या बाबत जगातील आघाडीच्या ब्रॅंड्स मध्ये होता. आपल्या एवढ्या वर्षांच्या वाटचालीत एबीडीने आपल्या उत्पादन श्रेणीचा विविध श्रेणीत आणि प्रकरात विस्तार केला आहे व नवीन उत्पादने सादर करत मद्य पेय प्रकारात आघाडी घेतली असून आयएमएफएल बाजारपेठेत वित्त वर्ष 2021 दरम्यान कंपनीचा 8.2% हिस्सा होता.
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, पेर्नोड रिकार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि रॅडिको खैतान लिमिटेड हे कंपनीचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत.
31 मार्च 2022 पर्यंत कंपनीच्या उत्पादनांच्या पोर्टफोलियोत व्हिस्की, ब्रॅंडी, रम आणि व्होड्का प्रकारातील 10 मोठ्या आयएमएफएल ब्रॅंड्सचा समावेश होतो. डीएचआरपीतील नमूद टेक्नोपॅकच्या अहवालातील संदर्भानुसार एबीडीचे ऑफिसर्स चॉइस व्हिस्कि, स्टर्लिंग रिझर्व आणि ऑफिसर्स चॉइस ब्यू हे ‘मिलिअनेअर्स ब्रॅंड’ म्हणून नमूद करण्यात आले आहेत, म्हणजे या ब्रॅंड्सची एका वर्षात 9 दशलक्ष लिटर्स केसेस पेक्षाही जास्त विक्री झाली आहे.
मद्य पेयांच्या पलिकडे एबीडी ऑफिसर्स चॉइस, ऑफिसर्स चॉइस ब्ल्यू आणि स्टर्लिंग रिझर्व्ह ब्रॅंड्स अंतर्गत सिलबंद पाण्याचीही विक्री करते आणि यातील उत्पादनांची 22 देशात आयातही करण्यात आली आहे ज्यात दक्षिण आणि उत्तर अमेरिका, अफ्रिका, आशिया आणि युरोपातील देशांचा समावेश होतो.
मद्य पेयांच्या वितरणावर घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही प्रकारात राज्य सरकारांचे प्रचंड नियंत्रण आहे. नवीन उच्छुकांना प्रवेशही सोपा नाही. एबीडीची विक्री आणि वितरणाचे जाळे 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात विस्तारलेले आहे. डीएचआरपी मध्ये नमूद केल्यानुसार 64,000 दुकानांद्वारे त्याची घाऊक विक्री केली जाते.
वित्त वर्ष 2021 दरम्यान अलाईड ब्लेंडर्स आणि डिस्टिलर्सचे एकूण उत्पन्न रू. 6378.78 कोटी आणि करोत्तर नफा रू. 2.51 कोटी होता. डिसेंबर, 2021 पर्यंत नऊ महिने संपत असताना कंपनीच्या उलाढालीतून एकूण उत्पन्न रू.5444.98 होते आणि करोत्तर नफा रू.3.30 कोटी होता.
वित्तीय वर्ष 2021 आणि 31 डिसेंबर, 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यात आयात आधारीत विक्रितून प्राप्त एकूण उत्पन्न अनूक्रमे रू. 133.55 आणि रू. 113.24 कोटी एवढे होते.
आयएमएफएल हा भारतीय मद्य पेय बाजारपेठेतील आकारमान आणि मूल्य या आधारावर सर्वात मोठा प्रकार आहे. वर्ष 2022 मध्ये आयएमएफएल च्या एकूण विक्रीचे मूल्य रू.1.74 ट्रिलियन आणि वित्त वर्ष 2025 पर्यंत रू.2.4 ट्रिलियन एवढे आणि एकूण विक्रीचे प्रमाण 425 केसेस असणे अपेक्षित आहे. वित्त वर्ष 2022 ते 2025 दरम्यान आयएमएफएल प्रकारातील विक्रीचे मूल्य 11.3% सीएजीआर आणि एकूण विक्रीचे 6.2% सीएजीआर एवढे वाढणे अपेक्षित आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटिड लिमिटेड, एक्सिस कॅपिटल लिमिटेड, जेएम फायनांशियल लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि एक्वायरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे प्रस्तावाचे रजिस्ट्रार आहेत. समभागांची बीएसइ आणि एनएसइ येथे नोंदणी प्रस्तावीत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading