एकनाथ शिंदेंचे थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

सुनिल प्रभूंनी काढेले आदेश ठरवले अवैध 

मुंबई :  शिवसेना पक्ष प्रतोदपदी आता आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी एक आदेश काढला होता. तो आदेश अवैध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी या ट्विट मध्ये म्हटंले  आहे. असे करून एकनाथ शिंदेंचे थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हाण दिले आहे.

शिवसेनेकडून बंडखोर आमदारां बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असे पत्र पाठवण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी हे पत्र काढले होते. त्याला प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी या ट्विट करून दिले आहे.

“आता हा आदेश अवैध असून विधिमंडळाच्या मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनिल प्रभू यांनी बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहे” असे या ट्विटमध्ये म्हटंले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: