…. तर मी राजीनामा द्यालया तयार आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  ज्यांना मी नकोय त्यांनी मला समोर येवून सांगावं. मला खुर्चीला चिकटून राहण्याचा मोह नाही. पण माझ्याच माणसांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर मी राजीनामा द्यालया तयार आहे. आज फेसाबूक लाईव झाले तर आज रात्रीच मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्ह द्वारे केले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी राजीनामा तयार ठेवलंय. पण मी पद सोडल्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. माझे नेतृत्व नको असेल तर मला समोर सांगा, मी मुख्यमंत्री पदासह पक्ष प्रमुख पदाचाही राजीनामा द्यायला तयार आहे. शेवटी पदं येतात पदं जातात, जनतेचा पाठिंबा हीच आयुष्याची कमाई असते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे – 

 • प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना कोविड काळात धैर्याने सामोरे गेलो
 • शास्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री दोन महीने भेटत नव्हते
 • शिवसेना हिंदूत्वा पासून कधीच वेगळे होवू शकत नाही
 • हिंदूत्वावर विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री होतो
 • बाळासाहेबांचेच विचार मी पुढे नेत आहे
 • 2014 मध्ये बिकट परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले
 • हिंदूत्व आमचा श्वास आहे
 • मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिले हे लक्षात ठेवा
 • शरद पवारांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री झालो
 • कोणताही अनुभव नसलेला माणूस मुख्यमंत्रीपद हे जिद्दीने निभावले
 • काळाच्या प्रकाराचा धक्का बसला आहे
 • कोंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी माझे नेतृत्व नाकारले नाही पण माझ्याच लोकांनी ते नाकारले
 • सरळ मला सांगितले असते तर मी राजीनामा स्वखुषीने दिला असतं.
 • गुजरातला जाऊन बोलायची काय गरज होती
 • मला समोर हे सांगितल्यास मी मुख्यमंत्री पदासह पक्ष प्रमुख पदाचाही राजीनामा द्यायला तयार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: