योगा डे निमित्त दत्तप्रभूंचरणी योगवंदना

पुणे : कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये योगा डे निमित्त एन्व्हायरॅान संस्था, मंदिराचे विश्वस्त व सेवेकऱ्यांनी दत्तप्रभूंचरणी योगवंदना अर्पण केली. भारतीय प्राचीन व्यायाम प्रकार म्हणून योगासने ही जग विख्यात आहेत. धार्मिकते सोबत भाविकांनी नियमीत योगाभ्यास करावा, हा संदेश या निमित्त भाविकांना देण्यात आला.
एन्व्हायरॅान संस्थेचे संस्थापक हिमांशू सांख्ये यांचे सह संस्थेचे राधिका जैन, सारीका सासवडे, प्रशांत ताम्हाणे, श्रद्धा नलावडे, कांचन बबलेश्वर सहभागी झाले. दत्त मंदिराचे कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार, व्यवस्थापक विजय पाचंगे, पुरुषोत्तम वैद्य गुरूजी यांचे सह भाविक व सेवेकरी अशोक यल्लारपूरकर, संतोष खेडेकर, हेमंत शेठ, नंदू चिप्पा, वैभव निलाखे व सुरक्षारक्षक साहेबराव वाघमारे यांनी योगवंदनेद्वारे अभिवादन केले.
अध्यात्माने जशी मनःशांती लाभते तसेच नियमित योगासने केल्याने शरीरस्वास्थ्य निरोगी राहते, अशी ग्वाही वयाच्या सत्तरीत असलेले डॅा. मधुसूदन घाणेकर यांनी दिली.दत्त मंदिर स्थापनेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सूर्यनमस्कार व दंडस्थिती मधील ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन आदी योगासनांमधून सायं आरतीच्या वेळी दत्तप्रभूंचरणी योगवंदना साकारण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: