शिवसेनेत जे काही चालल आहे त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही -चंद्रकांत पाटील

पुणे : शिवसेनेचे नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महा विकास आघाडी सरकार हे पडण्याची शक्यता झाली आहे. एकनाथ शिंदे हे ३०-३५ आमदार घेऊन सुरत वरुन आसाम ला घेऊन गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागण्या केल्या आहेत. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे त्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून संवाद साधला आहे त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की तो त्यांचा मनोगत आहे.यावर मी काहीही बोलू शकत नाही.हे जे काही शिवसेनेत चालल आहे त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही.अस यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे आज पुण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्यसभा आणि विधपरिषदेच्या निकालानंतर गुलाल उधळण्यात आला आहे आत्ता विधान सभा ची तयारी आहे का यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की मी हा गुलाल आत्ता राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी शिल्लक ठेवला आहे. असं देखील यावेळी पाटील म्हणाले
यावेळची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा कोण करणार असा प्रश्न सगळेजण विचारत आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यावेळेस चा जो मुख्यमंत्री असेल तो महापूजा पूजा करेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत अशी चर्चा आहे त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर पाटील म्हणाले,आमच्याकडे एक पद्धत आहे कोणतीही मोठी निवडणूक जिंकलो की दिल्लीत जाऊन पक्ष श्रेष्ठींना माहिती द्यावी लागते आणि त्यासाठी फडणवीस हे दिल्लीला गेले आहे.मी खूप दिवस मुंबई त राहिलो असल्याने मी इथ आलो आणि ते दिल्लीला गेले.असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: