‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे’ पुण्यात बॅनर्स च्या माध्यमातून विठूरायाला साकडे 

पुणे : राज्यात सध्या राजकीय वातावरण हे तापल आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेत. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, असं राऊतांनी ट्विटरवरुन म्हटलंय. यानंतर आज पुण्यात बॅनरबाजीला सूरवात झाली असून यंदाच्या ‘विठूरायाच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना येऊ दे’, अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला सुरवात झाली असून आज पालखीचे आगमन हे पुणे शहरात झाले आहे. या निमित्ताने पुण्यातील शिवाजीनगर येथील भाजपचे नेते प्रकाश सोलंकी यांनी बॅनरबाजी द्वारे विठ्ठलाकडे साकडे घातले आहे की हे माऊली तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे. तुझ्या पंढरपूर च्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र जी यांना येऊ दे .
या वेळेस आषाढी एकादशी दिवशी शासकीय पूजेला कोणता मुख्यमंत्री महापूजेला बसणार याची उत्सुकता राज्याला लागली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: