Saturday, September 5, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

“छावणी” नाटकाच्या प्रस्तुतीने प्रेमानंद गज्वींचा अमृतमहोत्सव साजरा झाला !

मुंबई : नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ‘थिएटर ऑफ रेलेवन्स नाटय सिध्दांत आणि बोधी नाट्य परिषद आणि श्री शिवाजी स्मारक मंडळ (रजि) यांच्या
संयोजनाने,अखेर सात वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षे नंतर काल बुधवार दिनांक 15 जून 2022 रोजी नाटककार प्रेमानंद गज्वी लिखित आणि रंगचिंतक मंजुल भारद्वाज दिग्दर्शित “छावणी” नाटकाचे सलग तीन प्रयोग, श्री शिवाजी नाटयमंदिर दादर येथे सादर झाले !
भारताने आपले सार्वभौमत्व सत्य,अहिंसा आणि स्वातंत्र्य या आपल्या जन्मसिद्ध हक्काच्या तत्त्वांद्वारे प्राप्त केले.गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेतून स्वातंत्र्य मिळवून जगात नवा इतिहास रचला. न्याय, समता आणि शांतता यासाठी नवीन संविधान निर्माण केले. विविधतेला सोबत घेऊन विसंगतीला दूर करण्यासाठी संविधानाच्या आधारे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने आपला ध्वज फडकावला.भारतात पसरलेल्या जातिवादामुळे होणारे शोषण आजही एक मोठे आव्हान आहे. वर्ण, जात आणि धर्मांधता हे मोठ्या जनसंख्येचे शोषण आजही करत आहेत.’बंदुकीच्या गोळीने सत्ता मिळते’ या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांना धर्म आणि जातीवर आधारित शोषणाला आधार बनवून शस्त्रक्रांती करून देशाचे संविधान पलटवायचे आहे.अगदी तसेच जसे वर्णवाद्यांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाने वामपंथी विचारधारा आणि दक्षिणपंथी विकाराला नाकारून अहिंसेतून स्वातंत्र्य मिळवले आणि जनतेला सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने संविधान निर्माण केले.आज सशस्त्र क्रांति करणारे आणि वर्णवादी,संविधानाला आव्हान देत आहेत. आज भारताला आपले संविधान वाचवण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
याच क्रमाने संविधानाचे पुरस्कर्ते नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘छावणी’ हे नाटक लिहिले आहे. शोकांतिका ही आहे की, संविधानाच्या बाजूने असलेल्या या नाटकाला महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) देशद्रोही ठरवून प्रमाणपत्र देण्यास नाकारले होते. मात्र बऱ्याच चर्चा संघर्षानंतर प्रमाणपत्र मिळाले. पण गेल्या सात वर्षांपासून कुठल्याच रंगकर्मीने या नाटकाची प्रस्तुती केली नाही.
थिएटर ऑफ रेलेवन्स नाटय सिद्धांताच्या  रंगकर्मींनी श्री शिवाजी नाट्यमंदिर येथे या नाटकाचे एकाच दिवशी तीन नाटयप्रयोग सादर करून हे धाडसी पाऊल उचलले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading