Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज ठाकरे यांनी भारत देश फिरला पाहिजे- खासदार सुप्रिया सुळे

पुणे: पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणीप्रश्नाबाबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी सुप्रिया सुळे यांनी आजचर्चा केली. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण तापलं आहे.राज ठाकरेंच्या विरोधात उत्तर भारतीय खासदारांसह अनेकजण एकत्र येऊन त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत आहेत. तर, काहीजण समर्थनार्थही भूमिका मांडत आहेत. त्यामुळे, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. ते 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी भारत देश फिरला पाहिजे, असे उत्तर दिलं.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरच लागणार आहेत त्यामुळे महा विकास आघाडी या निवडणुका एकत्र लढणार का असा प्रश्न सगळेच विचारत आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार याबाबत फायनल निर्णय घेतील असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नाबाबत महापालिकेचे आयुक्त व प्रशासक विक्रमकुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्या म्हणाल्या,यावेळी विक्रम कुमार यांनी  महापालिकेने बावधन, सुस व म्हाळुंगे या भागासाठी १८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याची माहिती दिली.
यासह फुरसुंगी, उरुळी देवाची या भागातील पाणीटंचाई संदर्भात देखील महापालिकेने तातडीची उपाययोजना करण्याचे मान्य केले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास द्यावयाच्या एकूण रकमेपैकी साडेचार कोटी रुपये तातडीने द्यायचे मान्य केले.

याप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाणी योजनांचे रखडलेले काम तातडीने सुरु करावे अशी विनंती केली. याच बैठकीत बावधन येथील कचरा प्रश्नासंदर्भात जनभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी विनंती महापालिका आयुक्तांना केली. जनतेच्या पाणीप्रश्नाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारचे मनापासून आभार. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading