fbpx

चित्रपट हे सामाजिक सलोखा राखण्याचं प्रभावी माध्यम

पुणे : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अमर देवकर यांनी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय पुणे या ठिकाणी चित्रपट मध्यम या विषयी आयोजित केलेल्या आयोजित परिसंवादात मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध लेखक राजन खान, शरद तांदळे, जेष्ठ पत्रकार संजय आवटे, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, शिवाजी दोलताडे अशा अनेक मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली होती. याप्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेता म्होरक्या या चित्रपटाचा विशेष शो प्रेक्षकांच्या आग्रहास्तव दाखवण्यात आला त्याच बरोबर अमर देवकर यांनी दिग्दर्शित केलेली महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याची असलेली कलाकृती “परदा” ही देखील दाखवण्यात आली.

या प्रसंगी बोलताना देवकर म्हणाले की भारतातील काही समाजात चालत असलेल्या मुलींच्या खतना किंवा सुंता प्रथेवर भाष्य करणारा ‘परदा’ हा लघुचित्रपट आहे. तर या लघुपटात शाश्वती खन्ना आणि माझा अभिनय रसिकांना पहायला मिळेल. महिलांच्या जिव्हाळ्याचा अत्य़ंत संवेदनशील विषय या लघुपटात सुंदररित्या हाताळला आहे. ते पुढे म्हणाले की मेंदूवरील अनेक पडदे उघडण्याची अपेक्षा घेऊन हा लघुपट इतरही चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.

राजन खान म्हणाले, की मराठी कलाकार दिग्दर्शक हे नेहमीच प्रसिद्धीपासून उपेक्षित राहिले असून आपल्या देशात त्यांना नावलौकिक मिळवायचे असेल त्यांचं कोणी कौतुक करावसं वाटत असेल तर त्यांना मरावं लागेल. आवटे म्हणाले की चित्रपट मध्यम हे सामाजिक सलोखा राखण्याचं प्रभावी माध्यम आहे. राष्ट्रीय पुरस्कारांनावर मराठी चित्रपटांचा नेहमीचं दबदबा राहिला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन येणारे सृजनशील दिग्दर्शकांची फळी आशादायी आहे. सदरील परिसंवादाला रसिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: