भारत बिलपेद्वारे भारतातील शेतकऱ्यांना रिकरिंग पेमेंट्स मिळवून देण्यासाठी फार्म्सशी करार

मुंबई : भारत बिल पेमेंट सिस्टीम या सर्व प्रकारच्या रिकरिंग पेमेंट्ससाठीच्या (वारंवार भरावी लागणारी पेमेंट्स) वन स्टॉप प्लॅटफॉर्मने फार्स्म अपशी सहकार्य केले असून त्यानुसार देशभरातील सर्व शेतकऱ्यांना रिकरिंग पेमेंट्स सुविधा मिळणार आहे. फार्म्स अपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी सहजपणे सर्व प्रकारची उत्पादने व सेवा मिळवता येणार असून त्यात बियाणेरासायनिक खतेपशुखाद्य आणि इतर उत्पादने थेट त्यांच्या घरी वितरित केली जातील. या सहकार्यामुळे त्यांना भारतातील शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ तयार करण्यास मदत होईलजिथे त्यांना विविध उत्पादने खरेदी करता येतील तसेच वीजकर्जपाणीपट्टी अशी विविध प्रकारची बिल्स एकाच अपवर भरता येतील.

भारत सरकार आणि आरबीआयच्या कॅश- लाइट अर्थव्यवस्थेचे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न असून भारत बिलपेने सातत्याने या नव्या भागिदारांशी सहकार्य करून, ग्राहकांसाठी रिकरिंग पेमेंट्स भरणे सुलभ करून डिजिटल सर्वसमावेशकतेला हातभार लावला आहे. या सहकार्यामुळे भारत बिलपे प्रत्येक भारतीय घराला त्यांच्या डिजिटल प्रवासात साथ देईल आणि त्यांचे हे स्थित्यंतर सुरळीत होईल याची खात्री करेल.

एनपीसीआय भारत बिलपे लि.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नुपूर चतुर्वेदी म्हणाल्या, ‘फार्म्स अपशी सहकार्य करून प्रत्येक भारतीय घराचे आयुष्य भारत बिलेपेच्या माध्यमातून सुलभ व सुरक्षित करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागिदारी शेतकऱ्यांना डिजिटल पेमेंट यंत्रणेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने टाकलेले तसेच देशातील दुर्गम भागापर्यंत पोहोचून आर्थिक सर्वसमावेशकतेची दरी सांधण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. अशा इतर भागिदारांसह सहकार्य करून नेटवर्क इफेक्ट तयार करण्यासाठी, सोयीस्कर, एकसंध आणि खात्रीशीर व्यवहाराचा अनुभव शेतकऱ्यांना तसेच देशभरातील कित्येक घरांना देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

फार्म्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि फार्म्सचे सह- संस्थापक तरणबीर सिंग म्हणाले, शेतकरी समाजात डिजिटल साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी आम्ही तळागाळात जाऊन काम करत आहोत. भारत बिलपे आपल्या देशातील बिले भरण्याच्या पारंपरिक पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणेल असा विश्वास आम्हाला वाटतो. भारत सरकारबरोबर सहकार्य करून फार्म्स अपमध्ये भारत बिलपेचा समावेश केल्याने ग्रामीण भारताला त्यांचे बिले केव्हाहीकुठेही आणि तत्काळ भरणे सहज शक्य होईल. हा निर्णायक क्षण असून त्याचे सूत्रधार होताना आम्हाला आनंद होत आहे.

फार्म्सचे सीओओ आणि सह- संस्थापक अलोक दुग्गल म्हणाले, ‘उत्तर आणि केंद्रीय भारतातील दुर्गम गावांपर्यंत आमची व्याप्ती विस्तारलेली आहे आणि गेल्या २ वर्षांत आम्ही शेतकरी समाजाचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालो आहोत. यामुळे आम्हाला पहिल्या काही अग्री- स्टार्टअप्सपैकी एक बनणे, ब्रँड्सचा ग्रामीण भारताशी कनेक्ट करून देणे शक्य झाले आहे.’

Leave a Reply

%d bloggers like this: