झी मराठीवर मनोरंजनाचा अधिक मास

प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी झी मराठी वाहिनी हि नेहमी तत्पर असते. झी मराठीवरील मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतात आणि म्हणूनच या मालिकांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळतं.
संध्याकाळ झाली कि ‘होम मिनिस्टर’ ते थेट रात्री १०.३० वाजता देवमाणूस बघितल्यावरच प्रेक्षकांच्या दिवसाची सांगता होते. आता झी मराठीच्या रसिक प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे. मे महिन्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा अधिक मास असणार आहे. आता सोमवार ते शनिवारच नाही तर रविवारी सुद्धा प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिका पाहू शकतील.
त्यामुळे आता रविवारीसुद्धा होम मिनिस्टर, मन झालं बाजींद, मन उडू उडू झालं, तू तेव्हा तशी, माझी तुझी रेशीमगाठ आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या आपल्या आवडत्या मालिका नेहमीच्या वेळेवर पाहायला विसरू नका, कारण आता मनोरंजनाला आता सुट्टी नाही.

One thought on “झी मराठीवर मनोरंजनाचा अधिक मास

  • May 5, 2022 at 7:21 pm
    Permalink

    आम्ही झी मराठी वरील प्रत्येक मालिकेच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देत आहोत फोनवर, पण काही उपयोग होत नाही, मला वाटतं आम्ही कर्नाटकाचे आहोत म्हणून आमचे उत्तर गाळला जात नाही

    Reply

Leave a Reply

%d bloggers like this: