किशोर कुमार यांची गाणी सलग ११ तास गाऊन विश्वविक्रम करणाऱ्या जितेंद्र भुरुक यांचा महाराष्ट्र दिनी होणार गौरव
पुणे : यक किशोर कुमार यांची ८९ गाणी सलग ११ तास गाऊन आणि एकाच दिवशी ५ वेगवेगळ्या थिएटरमध्ये १३५ गाणी सादर करून विश्वविक्रम करणाऱ्या गायक जितेंद्र भुरुक यांचा ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियातर्फे आयोजित हा पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी, १ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होईल.
या पुरस्कार सोहळ्याला इनोक डॅनिअल (संगीतकार), सुनेत्रा पवार (समाजसेविका), स्वप्नील जोशी (अभिनेता), मुरलीधर मोहोळ ( माजी महापौर, पुणे शहर), दीपक मानकर (माजी उपमहापौर), डॉ. पी. डी. पाटील, (कुलगुरू ,डी. वाय. पाटील विद्यापीठ), पवन सोळंकी (अध्यक्ष, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया), शोभा धारीवाल आणि पंडित सुरेश तळवलकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
सत्कार समारंभ नंतर जितेंद्र भुरुक यांचा गीत गाता हूँ मैं हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. आपल्या भव्य वाद्यवृंदासोबत ते हा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश मिळणार आहे.
