१२६ कर्णबधिर मुलांना मिळाले श्रवणशक्तीचे वरदान

मुंबई : जन्मजात बहिऱ्या असलेल्या कोणत्याही मुलासाठी आवाजाची जादूश्रवणशक्ती हे जगातील सर्वात मोठे वरदान आहे.  मानवी शरीरातील पंचेंद्रियांपैकी एक म्हणजे ऐकू येण्याची शक्ती. संवादसंभाषणभावनिक नातेसंबंध आणि शिकणे या सर्व प्रक्रियांमध्ये ऐकण्याची शक्ती अत्यंत आवश्यक असते.  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने जन्मजात बहिऱ्या असलेल्या १२६ मुलांना श्रवणशक्तीचे वरदान दिले आहे. या रुग्णालयाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सहयोगाने गेल्या वर्षभरात ही किमया यशस्वीपणे करून दाखवली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि महाराष्ट्र सरकार यांचा प्रमुख उपक्रम आहे.

 

कोविडमुळे निर्माण झालेली अनेक आव्हाने समोर असताना देखील हा उपक्रम पीपीपी मॉडेल स्वरूपात राबवला गेला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुले व त्यांच्या पालकांसाठी आयुष्यभराचे वरदान ठरला. हा उपक्रम जानेवारी २०२१ मध्ये सुरु झालाकोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने तेव्हापासून १२६ मुलांवर या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. ही मुले शाळेत जाऊ लागली आहेत आणि त्यांना आता ऐकू येत असल्यामुळे ती मुले बोलू देखील शकतीलही बाब मुलांच्या आईवडिलांसाठी अतिशय आनंद व समाधान देणारी ठरली आहे.

राज्य सरकारने या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आर्थिक साहाय्य दिले असून स्कॅनिंगइमेजिंगशस्त्रक्रियास्पीच थेरपी आणि रुग्ण व पालक यांच्या राहण्याची सोय ही सर्व जबाबदारी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने उचलली आहे. दोन वर्षांपर्यंतच्या वयाच्या मुलांसाठी विस्तृत ऑरेल रिहॅबिलिटेशन देखील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये केले जातेतसेच मुलांचे पालक आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना त्याचे प्रशिक्षण दिले जाते.

 

राज्य सरकारने नियुक्त केलेली विशेषज्ञ व एक सिव्हिल सर्जन यांची टीम जिल्हा पातळीवर शाळा आणि अंगणवाड्यांमार्फत मुलांची निवड करते. प्रत्यारोपणासाठी निवड होण्यापूर्वी ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री (बीईआरए) करून मुलाची ऐकण्याची क्षमता नेमकी किती आहे ते निश्चित केले जाते व ते मूल पूर्णपणे बहिरे आहे याची खात्री करवून घेतली जाते.  खात्री झाल्यानंतर त्या मुलाला तीन महिने एक हियरिंग एड दिले जाते आणि त्याला/तिला प्रत्यारोपणाची गरज आहे अथवा नाही ते तपासले जाते.  जर मुलाला प्रत्यारोपणाची गरज आहे हे लक्षात आले तर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलशी संपर्क साधण्यास सांगितले जाते.

Leave a Reply

%d bloggers like this: