विराजसने घेतला मजेदार उखाणा

किचन कल्लाकारच्या मंचावर प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक सेलिब्रिटी जोडपं पाहायला मिळणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. ते दोघे या किचनमध्ये एकत्र कल्ला करताना दिसणार आहेत.

किचन कल्लाकारमध्ये पाककलेसोबतच धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळतेच. या भागात विराजासने एक मजेदार उखाणा घेतला. विराजास उखाण्यात असं म्हणाला, “किचन कल्लाकारच्या मंचावर करायचंय आम्हाला श्रीखंड, शिवानी सोबत आहेच आता घेऊ का हे भांड?” हा उखाणा ऐकून सगळ्यांना हसून हसून लोटपोट झाले. शिवानीने हा उखाणा ऐकताना तिच्या पोटात गोळा आला असं म्हंटल. आता हे दोघे मिळून पदार्थ कसा बनवतील ते पाहणं औस्त्युकाच ठरेल. या दोघांसोबत या भागात रेणुका शहाणे आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर देखील दिसतील.

Leave a Reply

%d bloggers like this: