पहिल्या ‘सिल्व्हर करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेस सुरूवात
पुणे : सिल्व्हर क्रिकेट अॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘सिल्व्हर करंडक’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत एमजी क्रिकेट अॅकॅडमी आणि प्राधिकरण जिमखाना अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
सिल्व्हर क्रिकेट अॅकॅडमी मैदान, चिखली येथे सुरू असलेल्या स्पर्धेत रूशिल महाडीक याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एमजी क्रिकेट अॅकॅडमी संघाने २एन क्रिकेट अॅकॅडमी संघाचा ६ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना २एन क्रिकेट अॅकॅडमीने २३ षटकात १३३ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये शिवराज सुर्जवंशी याने नाबाद ८१ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. एमजी संघाच्या रूशिल महाडीक याने (३-१९) अचूक गोलंदाजी करून जबरदस्त कामगिरी केली. हे आव्हान एमजी क्रिकेट अॅकॅडमीने १७.४ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. आयुश कांबळे (नाबाद ४१ धावा) आणि प्रणित भालगट (नाबाद १७), सम्यक धनिजे (१६ धावा) यांनी संघाचा विजय सोपा केला.
स्वयम पाटील याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर प्राधिकरण जिमखाना अॅकॅडमी संघाने कॅनॉन क्रिकेट अॅकॅडमी संघाचा ६ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना कॅनॉन क्रिकेट अॅकॅडमीला ७८ धावाच जमविता आल्या. कृतार्थ मेद (३० धावा) याने कॅनॉन संघाकडून धावा काढल्या. स्वयम पाटील याने १९ धावात ३ तर, वेदांत चौधरी याने १३ धावात २ गडी बाद केले. हे आव्हान प्राधिकरण जिमखाना अॅकॅडमीने ११.२ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. प्रद्युम्न आटपाडकर याने नाबाद ४८ धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
गटसाखळी फेरीः सामन्याचा संक्षिप्त धावफलकः
२एन क्रिकेट अॅकॅडमीः २३ षटकात ८ गडी बाद १३३ धावा (शिवराज सुर्जवंशी नाबाद ८१ (८०, ११ चौकार, ३ षटकार), आयुष पारखे नाबाद १५, रूशिल महाडीक ३-१९) पराभूत वि. एमजी क्रिकेट अॅकॅडमीः १७.४ षटकात ४ गडी बाद १३६ धावा (आयुश कांबळे नाबाद ४१, प्रणित भालगट नाबाद १७, सम्यक धनिजे १६, भावेश चौधरी ३-२३); सामनावीरः रूशिल महाडीक;
कॅनॉन क्रिकेट अॅकॅडमीः २२.१ षटकात १० गडी बाद ७८ धावा (कृतार्थ मेद ३०, अर्थव सिंग १०, स्वयम पाटील ३-१९, वेदांत चौधरी २-१३) पराभूत वि. प्राधिकरण जिमखाना अॅकॅडमीः ११.२ षटकात ४ गडी बाद ७९ धावा (प्रद्युम्न आटपाडकर नाबाद ४८ (३५, ८ चौकार), वेदांत हेडगे १०, जीवन जोगदंड १-३); सामनावीरः स्वयम पाटील.
