एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी 3 संघाचा इलाईट गटात प्रवेश 

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी 3 संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत इलाईट डिव्हिजन गटात प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेट डिव्हिजन गटात पीवायसी 3 संघाने सोलारिस ईगल्स संघाचा 21-16 असा पराभव करून सलग चार विजयासह आगेकूच केली. विजयी संघाकडून डॉ.चारुदत्त साठे, सारंग देवी, अमित नाटेकर, ध्रुव मेड, मिहीर दिवेकर/सारंग देवी यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात मॉँटव्हर्ट प्रीस्टाईन 1 संघाने पीवायसी 6 संघाचा 24-06 असा पराभव केला.
निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन: 

मॉँटव्हर्ट प्रीस्टाईन 1 वि.वि.पीवायसी 6 24-06(100अधिक गट: श्रीनिवासन/संजीव माधव वि.वि.सुनीता रावळ/हरेश गलानी 6-2; 90अधिक गट: जयंत भाले/उज्वल जोशी वि.वि.रवी रावळ/बिपीन देव 6-1; खुला गट: नरेश अरोरा/सुयश नाहार वि.वि. शिरीष साठे/तन्मय आगाशे 6-1; खुला गट: संजीव माधव/धैर्यशील गोहिल वि.वि.आलोक तेलंग/चिन्मय चिरपुटकर 6-2);

 
पीवायसी 3 वि.वि.सोलारिस ईगल्स 21-16(100अधिक गट: डॉ.चारुदत्त साठे/सारंग देवी वि.वि.संजीव घोलप/संदीप आगटे 6-4; 90अधिक गट: अमित नाटेकर/ध्रुव मेड वि.वि.गिरीश साने/सिद्धार्थ भरमगोंडे 6-3; खुला गट: मिहीर दिवेकर/सारंग देवी वि.वि.सिद्धार्थ जोशी/निनाद वहीकर 6-3; खुला गट: श्रवण हार्डीकर/सारंग पाबळकर पराभूत वि.रवींद्र पांडे/अमित फाटक 3-6).    

Leave a Reply

%d bloggers like this: