बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ४९ टक्के विकास दरासह खासगी विमा क्षेत्रात आघाडीवर
पुणे : बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एका कंपनीने इंडिव्हिज्युल रेटेड बिझनेस (आयआरएनबी) प्रीमियममध्ये आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ४९.४ टक्क्यांची वाढ नोंदवत प्रभावी विकास दर्शवला आहे. कंपनीने केवळ मार्च २०२२ च्या एका महिन्यात ३९.३ टक्क्यांची सर्वाधिक वाढ (दहा आघाडीच्या खाजगी कंपन्यांमध्ये) नोंदवली असून त्यात कंपनीची सर्वसमावेशक उत्पादने, नाविन्यपूर्ण डिजिटल सेवा आणि दमदार विक्री जाळे यांचा मोठा वाटा आहे.
बजाज अलियान्झ लाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ म्हणाले, ‘इंडिव्हिज्युल रेटेड बिझनेस (आयआरएनबी) प्रीमियममध्ये ४९ टक्क्यांची दमदार वाढ नोंदवत (आयआरएनबीनुसार आघाडीच्या दहा खाजगी कंपन्यांमध्ये सर्वाधिक) गेल्या आर्थिक वर्षाची सांगता केल्याचा आनंद आहे. हे व्यावसायिकता, चिकाटी आणि दीर्घकालीन आर्थिक ध्येयांसाठी गुंतवणूक करताना पसंतीची भागीदार म्हणून कंपनीला मिळणारी पसंती अशा विविध व्यावसायिक निकषांवर करण्यात आलेल्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. दमदार उत्पादन श्रेणीबरोबरच तितकेच मजबूत वितरण नेटवर्क, ऑनलाइन व ऑफलाइन भागिदारांचे जाळे, आमचे प्रतिनिधी आणि प्रमुख विक्री कर्मचारी यांसह आम्ही या आर्थिक वर्षाची सांगता केली. हेच प्रमुख घटक आम्हाला पुढील वर्षीही मदत करतील. बजाज अलियान्झ लाइफ विविध प्रकारच्या सेल्फ- सर्व्हिसिंग आणि सहाय्यक सेवा पर्यायांसह ग्राहकांना लाभ देण्यासाठी यापुढेही गुंतवणूक करत राहील.
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये बजाज अलियान्झ लाइफ आयआरएनबी प्रीमियममध्ये ४९.४ टक्के वाढीसह वेगाने विस्तारत आहे, तर इंडस्ट्रीचा १५.७ टक्क्यांनी विकास झाला आहे. खासगी जीवन कंपन्यांचा विकासदर २१.९ टक्क्यांवर गेला आहे. कंपनीचा नियमित प्रीमियम सरासरी तिकिट साइजही आर्थिक वर्ष २०२१ मधील ५७,७८२ रुपयांवरून ३४.४ टक्के वाढ नोंदवत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ७७,६३४ रुपयांपर्यंत वाढला आहे.
कंपनीचा आयआरएनबी प्रीमियम आर्थिक वर्ष २०२१ मधील २४६८ कोटी रुपयांवरून वाढून आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३६८६ कोटी रुपयांवर गेला. रिन्यूवल प्रीमियममध्येही २२.४ टक्क्यांची वाढ होऊन तो आर्थिक वर्ष २०२१ मधील ५७१२ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ६९९१ कोटी रुपयांवर गेला. बजाज अलियान्झ लाइफचा एकूण रिटन प्रीमियम आर्थिक वर्ष २०२१ मधील १२,०५० कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १६,१२७ कोटी रुपयांवर गेला आहे.
