Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जे आहे ते समोर येईल शरद पवार यांचा विरोधकांना टोला

पुणे : भाजपचे नेते सारखे राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे असे म्हणत आहे. त्यावर या चर्चा केल्या जातात पण याचा काही फायदा होत नाही .सरकार गेल्यावर लोकं अस्वस्थ होतात.मी पुन्हा येतो म्हणत असताना सत्ता गेली .माझी सत्ता गेल्यावर मी रात्री १२.३० नंतर घर सोडलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता वानखेडे स्टेडियम वर मॅच पाहायला गेलो.सत्ता येते जाते पण अस्वस्थ होण्याची गरज नाही .जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जे आहे ते समोर येईल . असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विरोधकांना लावला.

राज्यात वीज टंचाईची समस्या नागरिकांना जाणवत आहे . त्यामुळे विरोधी पक्ष हे आक्रमक झाले आहेत त्यावर केवळ महाराष्ट्रात वीज टंचाई नाही.कर्नाटक मध्ये पण टंचाई आहे. मागणी वाढल्यामुळे हा तुटवडा आहे..विशेष करून शेतीसाठी वीज जास्त वापरली जात आहे .अश्यात केंद्र आणि राज्यांनी विचार करून प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे . असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन जोरदार राजकारण रंगलं आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली असून किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्यानंतर दिल्लीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी
प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले,

एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं,” असं शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading