गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल
पुणे: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. २२ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आता आज कोल्हापुरातून सदावर्ते यांचा पुणे पोलीस ताबा घेणार आहेत. पुणे पोलीस न्यायालयातच ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
सदावर्ते यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेणार आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ऑक्टोबर २०२० मध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
