रेनबो चिल्ड्रेन्स मेडिकेअर लिमिटेड : प्राथमिक समभाग विक्री २७ एप्रिल  रोजी होणार खुली

बालरोग, प्रसूती व स्त्रीरोग या क्षेत्रांत मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयांची शृंखला उभारणारी भारतातील आघाडीची कंपनी, रेनबो चिल्ड्रेन्स मेडिकेअर लिमिटेड, हिने प्राथमिक समभाग विक्री योजना घोषित केली असून येत्या बुधवारी, दि. २७ एप्रिल २०२२ रोजी ती खुली होत आहे. देशातील सहा शहरांमध्ये (हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, नवी दिल्ली, विजयवाडा व विशाखापट्टणम) १५०० खाटांची क्षमता असलेली १४ रुग्णालये व तीन दवाखाने या कंपनीतर्फे चालविण्यात येतात.

आयपीओच्या या योजनेत दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा किंमतपट्टा ५१६ रु. ते ५४२ रु. प्रति शेअर असा ठरविण्यात आला आहे. गुंतवणुकदारांना किमान २७ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २७ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.

या आयपीओमध्ये २८० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन इश्यूचा, तसेच प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स, इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स आणि इतर सेलिंग शेअरहोल्डर्स यांच्याकडील २४,०००,९०० इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा समावेश आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठीच्या राखीव समभागांसाठी ३००,००० इक्विटी शेअर्स ठेवण्यात आले आहेत.

नवीन शेअर्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील कारणांसाठी करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे : ‘सीडीसी इमर्जिंग मार्केट्स लि.’ या आपल्या समुहातीलच एका कंपनीला जारी केलेल्या ‘एनसीडीं’ची मुदतपूर्व पूर्तता करण्याकरीता ४० कोटी रु.; नवीन रुग्णालये उभारण्यासाठी व अशा नवीन रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी भांडवली खर्च १७० कोटी रु.; आणि इतर कॉर्पोरेट उद्देशांसाठी उर्वरीत रक्कम.

‘क्रिसिल’च्या अहवालानुसार, प्रसूती व बालरोग आरोग्यसेवा वितरण क्षेत्रातील तुलनात्मक कंपन्यांकडील दि. ३१ मार्च २०२१च्या आकडेवारीनुसार, ‘रेनबो चिल्ड्रेन्स मेडिकेअर’च्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या सर्वात जास्त होती. कंपनीचे संस्थापक प्रवर्तक डॉ. रमेश कंचर्ला यांच्या नेतृत्वाखाली रेनबोने बहु-विशेष बालरोग सेवांमध्ये एक निष्णात कंपनी म्हणून नावलैकिक मिळवला आहे. अत्यंत क्लिष्ट रोगांचे व्यवस्थापन करण्यात या कंपनीकडे मजबूत नैदानिक निपुणता आहे. प्रसूती व स्त्रीरोग सेवा देण्याकरीता या कंपनीने आपल्या कामकाजाची व्याप्तीही वाढवली असून रुग्णांना सर्वसमावेशक अशी प्रसूतिपूर्व सेवा देण्याची तजवीज केली आहे. ‘रेनबो’ची पाच रुग्णालये एनएबीएचद्वारे मान्यताप्राप्त आहेत आणि तीन रुग्णालये ईडीजीईद्वारे प्रमाणित आहेत.

‘रेनबो’मध्ये डॉक्टरांशी कटिबद्धता या मॉडेलचे अनुसरण करण्यात येते. ‘रेनबो’तील बहुसंख्य प्रमुख डॉक्टर्स हे रुग्णालयांमध्ये पूर्ण-वेळ तत्त्वावर काम करतात. त्यामुळे ते ‘रोस्टर’ आधारावर २४/७ उपलब्ध असतात. मुलांसाठीच्या आपत्कालीन परिस्थितीत, नवजात बालकांसाठी आणि बालरोगांच्या अतिदक्षता सेवांसाठी ही त्यांची कायम उपस्थिती महत्वाचे ठरते. दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजीनुसार, ‘रेनबो’मध्ये ६४१ पूर्णवेळ डॉक्टर आणि १,९४७ अर्धवेळ / अतिथी डॉक्टर होते. पूर्णवेळ डॉक्टरांचे मॉडेल आणि त्याचबरोबर मध्यम पदांवरील डॉक्टरांची मोठी संख्या यांमुळे ‘रेनबो’च्या रुग्णालयांमध्ये अखंडीत आरोग्यसेवा उपलब्ध असते. त्यामुळे रुग्णांना उच्च दर्जाचे समाधान लाभते.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे या ‘आयपीओ’चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: