नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपाचे भाडोत्री टॅक्सी -डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे भाडोत्री टॅक्सी आहेत. हनुमान चालिस हे श्रद्धापूर्वक करण्याची बाब आहे. परंतू त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत आहे. यास आमचा नेहमीच विरोध असणार आहे. भाजपाचे हे भाडोत्री शेंदाडशिपाई असल्याची टीका शिवसेना नेत्या व विधानसभेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्याचे आंदोलन सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर गोऱ्हे म्हणाल्या,आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा हे कधी शिवसेनेत तर कधी भाजपमध्ये असतात. त्यानी हनुमान चालीसा वरून
फक्त हे नाटक करण्याचे ठरवले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पण नुसती महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविरुद्ध जादूगर सारखि दररोज काहीतरी वेगळे बोलून नाटक करत आहेत. शिवसेना कदापि त्यांचे नाटक सहन करणार नाही असा इशाराही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला.