‘हाय होल्टेज ड्रामा’नंतर राणा दांपत्यांना अटक, उद्या कोर्टात हजार करणार

मुंबई : ‘हाय होल्टेज ड्रामा’नंतर अखेर आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना उद्या कोर्टात हजार करण्यात येईल. मात्र राणा दांपत्यांची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतल्याचे काही वेळापूर्वी घोषणा केली. “कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून माझीही जबाबदारी आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत”, अशी घोषणा आमदार रवी राणा यांनी केली होती. मात्र त्यांच्या घराच्या बाजूने शिवसैनिक काही हलायला तयार नव्हते. अशावेळी मुंबई पोलिसांनी कारवाई करत राणा यांना ताब्यात घेतले व गर्दीतून बाहेर काढले.

त्यानंतर त्यांच्यावर खार पोलिसात गुन्हा दाखल करून ताब्यात ठेवण्यात आले आहे. यावेळी रवी राणा म्हणाले की, आमचा आग्रह हनुमान चालिसासाठी होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवत शिवसैनिक आम्हाला घाबरवण्यासाठी पाठवले. राज्यसरकार बळाचा चुकीचा वापर करत आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: