मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल

मुंबई : खार पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. जीवे मारण्याचा कट रचणे, चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी खार पोलिस ठाण्यात ही तक्रार राणा दांपत्यांनी दाखल केली आहे.

तक्रारीत असे म्हटंले आहे की, आम्ही फक्त हनुमान चालीसा वाचण्यासाठी जाणार होतो. पण आम्हाला जीवे मारता येईल असे वातावरण तयार करण्यात आले. अॅब्युलन्स देखील आणण्यात आली होती. शिवसैनिकांकडे बॅट व हत्यार सादृश्य वस्तू होत्या. आम्हाला संपवण्याचा कट रचण्यात आला. आमच्या जीवाला काही धोका झाल्यास त्याला मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब हे जबाबदार असतील, असे या तक्रारीत म्हटंले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: