रायगड किल्ल्यावर मधमाशांच्या हल्ल्यात महिला दरीत कोसळली
पुणे : मुंबई इंडियन्स संघाच्या सरावादरम्यान मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रसंग ताजा असतानाच आता राजगड किल्ल्यावर पर्यटणासाठी आलेल्या पर्यटकांना मध मांशांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे. मधमाशांचे मोहोळ मागे लागल्याने किल्ल्यावर पर्यटकांची चांगलीच पळापळ झाली. या हल्ल्यात एक महिला किल्ल्याच्या तटबंदीवरून 200 फुल खोल दरीत कोसळून जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिनी सागर वराट (वय 29, रा. वाकड, पिंपरी चिंचवड) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मधमाशांकडून हल्ला झाल्यावर पर्यटकांमध्ये एकच खबराट पसरली. नागरिक सगळीकडे पळू लागले. या पाळापळीत सदर महिला 200 फुल खोल दरीत कोसळली. आता स्थानिकांच्या मदतीने दरीत कोसळलेल्या या महिलेला बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याआधीदेखील राजगड किल्ल्यावर मधमाशांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत.
