राज्यातील वीज टंचाई प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे:उन्हाची तीव्रता वाढल्याने विजेचा शॉर्टेज निर्माण झाला आहे. देशभरात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर कोळसा मिनिस्ट्रीलाही सांगण्यात आलं. कमी दिवसाचा कोळसा आहे. तो वाढवून द्या. मार्केटमध्ये जिथे वीज आहे ती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याबाबतची कॅबिनेटने परवानगी दिली आहे. भारनियमन होणार नाही याची खबरदारी घेतली आहे, वीज संकटात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातलं आहे. त्यामुळे मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल असं वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता पत्रकारांशी बातचीत करताना केले.

अजित पवार म्हणाले ,राज्यासह देशात कोळश्याचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमनाचं संकट आहे. पण आम्ही भारनियमन होऊ देणार नाही. मार्केटमधून वीज खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. बाहेरून वीज खरेदी करू, पण राज्यात भारनियमन होऊ देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे. वीज भारनियमन होणार नाही यासाठी सर्व खबरदारी घेत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला नितीन राऊतही उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी कॅबिनेट होती. ब्रीफ केलं. सर्वांनी त्यात लक्ष घातलं आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

%d bloggers like this: