पुरंदर ही नवीन पर्याय स्वीकारणारी भूमी : मुकुंद किर्दत

सासवड येथे आपची कार्यकर्ता बैठक

पुणे : आप हा जनतेचा आवाज आहे व काम की राजनीती करणारा एक वेगाने वाढणारा राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची ओळख आता झाली आहे. पुरंदर तालुक्यासाठी महाविकास आघाडीमुळे आवाज उठवणारा विरोधी पक्ष उरला नाही. ज्यांच्या हातात सत्ता आली त्यांनी विमानतळ, राष्ट्रीय बाझार, गुंजवणी प्रकल्प यातले काहीच पुढे नेले नाही, उलट एकमेकावर चिखलफेक करीत ,गद्दार ठरवण्यात सर्व शक्ती खर्च केली. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणघेणे उरलेले नाही. त्यामुळे आम् आदमी पार्टी आता जनतेचे मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवेल. पुरंदर तालुक्याने एकेकाळी जनता दल सारखा पर्याय सहज स्वीकारला होता, त्यामुळे आपचे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते असे आप चे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

नुकतीच सासवड येथे आपची कार्यकर्ता बैठक पार पडली. त्यास सासवड, जेजुरी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

दिल्ली नंतर पंजाब मधील विजयामुळे सामान्य जनतेच्या आशा जागृत झाल्या आहेत, असे यावेळेस आप चे स्थानिक समन्वयक गणेश चौधरी यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर पक्ष कार्यकर्ता मोहीम राबवण्यात येणार असून गावातही संपर्क मोहीम राबवण्यात येणार असल्याचे समन्वयक दत्तात्रय कड यांनी सांगितले.

दिल्लीतील वीज बिल माफी, उत्तम सरकारी शाळा, मोफत आरोग्यसेवा , घरपोच सुविधा यामुळे आप चे दिल्ली मॉडेल हे आता सर्वांना माहीत झाले आहे. महाराष्ट्रातही ग्रामीण भागात आपला संधी आहे. त्यामुळे नव्याने संपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील इतर पक्षांतील दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते आपच्या संपर्कात आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: