कोरोना मृतांच्या वारसांना 50 हजारांची मदत अर्ज करण्याचे आयुक्त विक्रमकुमार यांचे आव्हान

पुणे : कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. याकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.
मात्र हे अर्ज सादर करताना चुकीची प्रमाणपत्रे सादर करुन अनुदान मिळवण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे महापालिकेकडून देण्यात आला आहे.
मृतांच्या निकटच्या नातेवाईकास सानुग्र स्वरुपात मदत करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर करण्यासाठी mahacovid19relief.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे. या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून ऑनलाईन आलेल्या अर्जांची छनणी करण्याचे काम पुणे महापालिकेमार्फत सुरु करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती तसेच कोरोनामुळे 20 मार्च 2022 पर्यंत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी 24 मार्च 2022 पासून पुढील 60 दिवसांमध्ये सानुग्रह मदतीसाठी अर्ज करावा. 20 मार्च 2022 नंतर मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी मृत दिनांकापासून पुढील 90 दिवसांमध्ये अर्ज करावा.


अन्यथा कारावास आणि दंडाची शिक्षा
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांनी 50 हजार सानुग्र मदत मिळविण्यासाठी चुकीची मागणी/चुकीची प्रमाणपत्रे सादर करुन अनुदान मिळवण्याचा प्रयत्न केला तर 2 वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: