राज ठाकरे च्या फुटक्या भोंग्याला आवर घाला; रिपब्लिकन सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पोलीस प्रशासनाच्या गुळगुळीत भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप

औरंगाबाद : आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने 1 मे रोजी राज ठाकरेंच्या सभेत वादग्रस्त व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी गरळ ओकण्याची शक्यता असल्याने त्याला तात्काळ आवर घालावा अशी मागणी करणारे निवेदन नि.उपजिल्हाधिकारी ह्यांना सादर करण्यात आले तसेच पोलीस प्रशासनाच्या संदिग्ध भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने ह्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.


ह्यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत रुपेकर,मराठवाडा संघटक आनंद कस्तुरे,जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धोधन मोरे,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, शहराध्यक्ष मिलिंद बनसोडे, पूर्व चे शहराध्यक्ष धम्मपाल भुजबळ,विकास हिवराळे,महासचिव अक्सर भाई खान,असद शहा,अय्युब शहा आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: