आमच्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही

पुणे:गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधी आंदोलन करण्यासाठी महासंघाचे काही कार्यकर्ते आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासमोर एकत्र जमा झाले याप्रसंगी या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही प्रमुख पदाधिकारी हार,पुष्पगुच्छ व नारळ घेऊन उपस्थित होते.

“देशाचे लोकनेते पवार साहेब यांनी या पक्ष कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी असे जाहीर केले होते की, हे पक्ष कार्यालय पुणेकरांच्या सेवेचे प्रमुख केंद्र असून या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत केले जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या प्रथेप्रमाणे आम्ही आज त्यांचे स्वागत केले. त्यांनी जर शांततेच्या मार्गाने चर्चा केली असती तर आम्हाला ती मान्य होती. परंतु त्याच्या आडून आमचे नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही”. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: