जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त स्पर्धा आणि विविध कार्यक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उपक्रम

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्याने सुरु करण्यात आलेल्या व्यंगचित्र संग्रहालयात ५ मे रोजी ‘जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त’ व्यंगचित्रकला स्पर्धा, स्थानिक हौशी व्यंगचित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्यंगचित्रकला स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. यासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

याचबरोबर या दिवसाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील हौशी व्यंगचित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात येणार आहे.

तर आठ ते बारा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी जी व्यंगचित्रकला कार्यशाळा घेण्यात येणार आहे त्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे, तसेच यासाठी मर्यादित २५ जागा असून प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

व्यंगचित्रकला स्पर्धा, स्थानिक हौशी व्यंगचित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि मुलांसाठी व्यंगचित्रकला कार्यशाळा या सर्वांची तपशीलवार माहिती http://www.unipune.ac.in विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रेस रिलीज सेक्शनमध्ये जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: