fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

तेजस मोरे यांचा मॅनेजर राहुल सैतवाल याला सीआयडीने जबाब नोंदवण्यासाठी बोलावले


पुणे: देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभागुहात सादर केल्या पेन ड्राईव्ह चा तपास सध्या सीडीआय कढुन सुरू आहे. त्यावर कोथरूडमध्ये दाखल असलेल्या आरोपींच्या घरी पोलीस छाप्यावेळी पंच म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. तेजस मोरे यांचा मॅनेजर राहुल सैतवाल याला सीआयडीने जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. तर, तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर राहुल सैतवाल याने गंभीर आरोप केले आहेत. सीआयडीचे समन्स येण्याअगोदरपासून आपल्याला अनोळखी नंबरवरून धमक्या येत असल्याचे सैतवाल याचे म्हणणे आहे. या धमक्या प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत येत असल्याचा दावा सैतवाल याने केला आहे. विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर करून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading