धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला अटक  

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करून खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला आज   पोलिसांनी अटक केली आहे. रेणू शर्माला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धनंजय मुंडे यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात रेणू शर्मा विरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज मुंबई क्राईम ब्राच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केली.  दरम्यान, कोर्टात हजर केल्यानंतर रेणू शर्माला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘मागील वर्षी सहजच एक कागद पोलिसांत दिला तर तुमचं मंत्री पद धोक्यात आलं होतं, आता पुन्हा तिच माझ्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार करून सोशल मीडियावरून बदनामी करून तुमचं मंत्रीपद घालवीन, असं होऊ द्यायचं नसेल तर मला 5 कोटी रक्कम आणि 5 कोटींचे दुकान घेऊन द्या’, असं ब्लॅकमेल करत अशा प्रकारची खंडणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे कथित रेणू शर्मा मागितली होती.

माझी सहनशक्ती संपली आहे – धनंजय मुंडे

“गेल्या वर्षभरापासून ही महिला ब्लॅकमेल करीत होती. पण आता माझी सहनशक्ती संपली आहे. त्यामुळे मी पुराव्यासह पोलिसात तक्रार केली. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: