गांधी भवनच्या रोझा इफ्तार मध्ये एकात्मतेचे दर्शन

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार कार्यक्रमाला गुरूवारी सर्वधर्मीय बांधवांनी उपस्थित राहून एकात्मता, बंधू भावाचे दर्शन घडवले.रोजा इफ्तार कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन,युवक क्रांती दलाचे संदीप बर्वे यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गांधी भवन, कोथरूड येथे पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील , सर्व धर्मिय मान्यवर उपस्थित राहिले. त्यामध्ये माहेर संस्थेच्या ल्यूसी क्युरीयन, स्नेहसदन चे फादर रॉबर्ट, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे तसेच संजय आवटे , निकोल पवार

( सचिव, माहेर संस्था ) , लक्ष्मीताई दुधाणे राष्ट्रवादी काँग्रेस , सोनाली मारणे सचिव महाराष्ट्र Pradesh काँग्रेस पक्ष , असलम बागवान, युनुस भाई तांबटकर, अंजुम इनामदार, अॅड. मंजुषा नयन – आम आदमी पार्टी, शंकर केमसे, मोहनराव मते, अनीस अहमद – समाजवादी पक्ष ,मुख्तार मणियार, नुरु पटेल, नवाझ खान, जमीर पटेल, असरार खान उपस्थित राहिले.

इम्तियाज शेख यांनी सर्व मान्यवरांना कुराणाची प्रत भेट दिली.

संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, विजय बोडेकर, सचिन पांडुळे, प्रसन्न मराठे, नीलम पंडित, कमलाकर शेटे, सुदर्शन चखाले, रोहन गायकवाड, अजय नेमाणे, शाम तोडकर, विवेक काशीकर, रेश्मा सांबरे, प्रसाद झावरे, डॉ. प्रवीण सप्तर्षी, आदित्य आरेकर, अभिजीत मंगल, आवेद सय्यद यांनी संयोजन केले.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गांधी भवन मध्ये रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला . हिंदू- मुस्लिम ऐक्य, सर्वांना रोजगार आणि जातीनिर्मूलन हे गांधीजींनी सांगितलेले भारतीय राष्ट्रवादाचे तीन आधार आहेत. एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आणि एकमेकांच्या सण उत्सवात आनंदाने सहभागी होणे, हे भारतीय धर्मनिरपेक्षतेचे आहे. दिवाळी, रमजान त्यासंदर्भातले तीन प्रमुख सण आहेत, ज्यात प्रत्येक भारतीयाने सहभाग घेतला पाहीजे. राष्ट्राची एकता नाताळ हे आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधूता निर्माण करण्याचा संकल्प भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये नमूद करण्यात आला आहे. त्या संकल्पाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या रोजा इफ्तार कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे विविध मान्यवर सहभागी झाले. 

Leave a Reply

%d bloggers like this: