झोयाच्या दागिन्यांचे प्रदर्शन २२ एप्रिल पासून
पुणे :- पुण्यातील मगरपट्टा रोडवरील तनिष्क शोरूममध्ये टाटा समूहाचा एका भाग असणाऱ्या झोया ब्रॅण्डने दागिन्यांच्या संग्रहचे प्रदर्शन आयोजीत केले आहे. पारंपरिक बाजाचे तसेच कुशल तज्ञ कारागिरीने आणि विशिष्ट डिझाइने बनवलेले झोयाचे दागिने या प्रदर्शनात पुणेकरांना पाहण्यसाठी ठेवण्यात येणार आहेत.
हे प्रदर्शन २२ एप्रिल २०२२ ते २४ एप्रिल २०२२ सर्वांसाठी खुले आहे. तनिष्क शोरूम मगरपट्टा रोड, हडपसर, पुणे येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाची वेळ ही सकाळी ११:०० ते रात्री ८ :०० वाजेपर्यंत आहे. सामवे,एटर्ना,रूटेड, या श्रेणीतील उत्कृष्ट दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे.भारतीयांचे हृदय आणि जगावर लक्ष ठेवून झोयाच्या दागिन्यांची निर्माती केली गेली आहे.