पीएमपीएमएलचा सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे व आय.टी.डी.पी. यांच्यासोबत सामंजस्य करार

पुणे : पीएमपीएमएलचा सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे व आय.टी.डी.पी. सोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार पार पडला. यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे चे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, सिम्बॉयसिस च्या असो. प्रोफेसर स्वाती विस्पुते व आय.टी.डी.पी.चे प्रांजल कुलकर्णी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.

याप्रसंगी पीएमपीएमएल च्या सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरूरे, एस.टी.पी.आय.चे संचालक संजय गुप्ता, सी.ओ.ई.पी. च्या डीन मा. अर्चना ठोसर, सिम्बॉयसिस च्या प्रोफेसर मा. जया, आय.टी.डी.पी.चे सिद्धार्थ गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅन्ड अर्बन प्लॅनिंगची स्थापना केली आहे.  वाहतूक क्षेत्रातील मधील तज्ञ लोकांना एकत्र आणून 'व्हिजन डॉक्युमेंट्री' तयार केली आहे. त्यातील ध्येय धोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. तसेच फेलोशिपच्या माध्यमातून इंजिनिअरींगच्या विविध विभागातील मास्टर्स डिग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पीएमपीएमएल ला येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी मदत करणार आहेत.

याप्रसंगी बोलताना कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे चे संचालक डॉ. बी.बी.अहुजा म्हणाले, “पीएमपीएमएल सध्या चांगल काम करत आहे आणि त्यांच्या सोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे. आम्ही याच वर्षीपासून ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम चालू केला आहे त्यामुळे या निमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली काम करण्याची संधी मिळेल.”

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, “पीएमपीएमएलची स्थापना २००७ मध्ये झाली. आता पीएमपीएमएलला नवीन स्वरूप देण्याची गरज आहे. अपडेट होणे ही एक प्रक्रिया असुन पीएमपीएमएल देखील अपडेट होत आहे. अपडेट होत असताना प्रॉब्लेम कुठ येतोय, प्रॉब्लेम आला तर त्याच टेक्निकल सोल्युशन काय हे या सामंजस्य कराराच्या माध्यमातून समजण्यास मदत होणार आहेत.”

डॉ. चेतना केरूरे म्हणाल्या, “पीएमपीएमएलला सहकार्य करण्यासाठी पुणे शहरातील नामांकित संस्था या सामंजस्य कराराच्या निमित्ताने पुढे आल्या आहेत ही एक पीएमपीएमएलच्या दृष्टिने अभिमानास्पद बाब आहे, संस्थात्मक बदल आणि प्रवाशांचा अनुभव यातील दरी मिटविण्यासाठी नामांकित संस्थाचे मार्गदर्शन मिळाले तर पीएमपीएमएल मध्ये सकारात्मक बदल करणे शक्य होईल.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. अक्षय घोळवे यांनी केले तर मुख्य अभियंता मनोजित बोस यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: