औरंगाबाद येथील राज ठाकरेंच्या सभेला वंचित बहुजन आघाडीचा विरोध

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र जातीय तेढ निर्माण होवू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीसह सहा संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध केला आहे. सध्याची परिस्थिती, रमाजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा असे विविध विषय उपस्थित करत अनेक संघटनांनी पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये, असे निवेदन दिले आहे.

या विषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा सांगून औरंगाबाद पोलिस प्रशासनाने मुस्कानच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. मग महिनाभरातच पोलिस राज्याचे राजकारण तापवणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला कशी परवानगी देवू शकतात. कोणत्याही समाजातील लोकांची माथी कधीही भडकू शकतात, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेला वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल, प्रहार संघटना, मौलांना आझाद  विचार मंच, गब्बर ॲक्शन संघटना, ऑल इंडिया पँथर सेना आदींनी विरोध केला आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: