राज्यातील 5 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील 5 आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त दर्जांच्या पोलीस अधिकारी यांच्या बदली करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी  याबाबचे आदेश काढले आहेत.

बदली करण्यात आलेल्या  पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कोठून कोठे

  1. सुहास वारके विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था मुंबई  ते सह पोलीस आयुक्त गुन्हे, बृहन्मुंबई 
  2. मिलिंद भारंबे  सह पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते विषेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मुंबई)
  3. सुरेश कुमार मेकला सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे 
  4. रविंद्र शिसवे सह पोलीस आयुक्त, पुणे शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक,
    महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई 
  5. दीपक पांडे  पोलीस आयुक्त, नाशिक शहर  ते विशेष पोलीस महानिरीक्षक,
    महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई. 

Leave a Reply

%d bloggers like this: