Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

PCMC : पोलीस आयुक्तपदी आयपीएस अंकुश शिंदे यांची नियुक्ती; कृष्ण प्रकाश यांची बदली

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची आज (बुधवारी) बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी आयपीएस अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.मावळते आयुक्त कृष्णप्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही आय पी सुरक्षा मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून आयपीएस अंकुश शिंदे हे आयुक्तालयाचे चौथे पोलीस आयुक्त असतील . आयुक्त कृष्णप्रकाश यांनी 05 सप्टेंबर 2020 रोजी पिंपरी चिंचवडचा पदभार स्वीकारला होता.अंकुश शिंदे यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक , सुधार सेवा मुंबई येथे सेवा बजावत होते.

राज्य गृह विभागाने आज संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.त्यामध्ये अनेक आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे . अप्पर पोलिस आयुक्त , सह आयुक्त तसेच काही शहरांच्या आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत . यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची देखील बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading