पीएमपीएमएल मध्ये महिला सेविकांसाठी रंगला खेळ पैठणीचा

पुणे :पीएमपीएमएल च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व महिला सेविकांसाठी आयोजित केलेला “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.
कार्यक्रमास पीएमपीएमएल च्या सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरूरे, पुणे मनपाच्या उपायुक्त मा.
रंजना गगे, पुणे मनपाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, पुणे मनपाच्या उपायुक्त  आशा राऊत, पुणे मनपाच्या उपायुक्त
डॉ. ज्योती धोत्रे,  पुणे मनपाच्या सहाय्यक आयुक्त  प्रज्ञा पोतदार, एसटी स्वारगेट बसस्थानकाच्या आगार प्रमुख मा.
पल्लवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात दिलेला टास्क पूर्ण करणे अन् सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात स्पर्धा
रंगली. पीएमपीएमएल च्या सर्व विभागात काम करणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्पर्धेचा आनंद लुटला.
रस्सीखेच, उखाणे, संगीतखुर्ची अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाची उडालेली धांदल
अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले.
प्रथम विजेत्या ऋतुजा सातभाई (प्रशासन विभाग) यांचा पैठणी देऊन गौरव करण्यात आला. व्दितीय विजेत्या ज्योती
गायकवाड (निगडी आगार) यांना सोन्याची नथ देऊन गौरविण्यात आले. तृतीय विजेत्या निलिमा वावरे (न.ता.वाडी आगार)
यांना चांदीचा छल्ला देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रगती पासलकर (कोथरूड आगार), तेजस्विनी वाघमारे (कोथरूड
आगार), सुवर्णा कुदळे (कोथरूड आगार), संगीता बनसोडे (बी.आर.टी विभाग), अस्मिता गोसावी (कोथरूड विभाग), मालती श्रावणी (निगडी आगार), सुजाता आरडे (वाहतूक व्यवस्थापक कार्यालय), रोहिणी शेवाळे (पिंपरी आगार) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना पुणे मनपाच्या उपायुक्त रंजना गगे म्हणाल्या, “पीएमपीएमएलने महिला सेविकांसाठी
आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे महिला सेविकांना नक्कीच प्रेरणा मिळेल. असे कार्यक्रम वर्षातून किमान एकदा आयोजित केले जावेत.”
पुणे मनपाच्या उपायुक्त मा. आशा राऊत म्हणाल्या, “सर्व महिला विविध पदावर काम करत असताना वर्षाचे ३६५
दिवस काम करत असतात परंतु आपल्या मध्ये असलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल तर आपण त्या संधीच सोन करतो व आपण त्या माध्यमातून जीवनाचा रंग बदलत असतो. महिलांसाठी पीएमपीएमएलने असा आगळावेगळा कार्यक्रम घेऊन महिला कर्मचाऱ्यांना संधी दिली आहे. असा कार्यक्रम नक्कीच कौतुकास्पद ठरेल.”

पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे म्हणाल्या, “कंडक्टर व ड्रायव्हर यांची
फिल्डवरची ड्युटी किती कठीण आहे याची जाणीव प्रशासनाला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून फिल्डवर काम

करणाऱ्या सेवकांना विरंगुळा मिळावा व त्यांच्या फिल्डवरील कामाप्रती कृतज्ञता म्हणून पीएमपीएमएलच्या वर्धापन
दिनानिमित्त आठवडाभर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.”  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएमपीएमएल च्या कंपनी सेक्रेटरी नीता भरमकर यांनी केले तर आर.जे. अक्षय घोळवे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: