Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

मशीदीच्या समोर भोंगे तुम्ही लावा, आम्ही भोंगे वाजवू अझहर तांबोळी यांचा राज ठाकरे ना इशारा

पुणे : राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत प्रमाणे कालपण पुण्यातील पत्रकार परिषदेत आम्ही मशिदीवरील भोंगे वाजणारच अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे काही मुस्लिम समाजांच्या लोकांचे म्हणणे आहे. की आम्हाला त्रास होतो, त्यामुळे मुस्लिम संघटना या राज ठाकरेंवर नाराज झाले आहेत. मशिदीच्या भोंग्या वरून राजकारण होत आहे. अशा काही मुस्लिम संघटना व विरोधी पक्ष पण म्हणत आहेत. त्यावर मशिदींवरील भोंग्यांसदर्भात एसडीपीआयचे राज्य सचिव अझहर तांबोळी यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे. ते म्हणाले,मशिदींच्या समोर भोंगे तुम्ही लावा, आम्ही भोंगे वाजवू असा इशारा एसडीपीआयचे राज्य सचिव अझहर तांबोळी यांनी राज ठाकरे यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला.

या पत्रकार परिषदेला एसडीपीआयचे सदस्य उपस्थित होते. तांबोळी म्हणाले, राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केले आहे.राज ठाकरेंना हिंदुत्वाचे राजकारण करायचे आहे.अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा इशाराही तांबोळी यांनी राज ठाकरेंना दिला .
अजहर तांबोळी यांनी यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणतात, की ते हिंदू ओवैसी आहेत. तर मग जसे ओवैसींना रोखण्यासाठी प्रयत्न केले, तसे तुम्ही राज ठाकरेंना काय रोखण्यासाठी काय करत आहात, असा सवाल तांबोळी यांनी केला आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल का होत नाही. असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आम्ही मुस्लीम समाजाच्या बाजूने आहोत. मुस्लीम समाजाला व्हिक्टीम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ते हिंदू ओवैसी आहेत तर त्यांना दाबून ठेवा. सगळे निर्बंध मुस्लीम समाजावर का? आम्ही घटनात्मक मार्गांने उत्तर देणार. असा इशाराही तांबोळे यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading